पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाइन कोर्स
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, पालक आणि शिक्षक आपल्या मुलांच्या सुरक्षेची सक्रियपणे काळजी घेऊ शकतील.
ममुलांना वैयक्तिक सुरक्षा शिकवण्यासाठी पालक, शिक्षक आणि काळजीवाहक या सर्वोत्तम व्यक्ती आहेत. जर तुम्ही पालक, शिक्षक किंवा मुलांना असुरक्षित स्पर्शांपासून सुरक्षित ठेवण्यात स्वारस्य असलेल्या प्रौढांपैकी असाल, तर तुम्ही या ऑनलाइन कोर्सचा विनामूल्य लाभ घेऊ शकता.
हा कोर्स तुम्हाला अगदी कमी वेळेत म्हणजेच 5 मिनिटांमध्ये करता येईल आणि त्यानंतर तुमच्या मुलांसोबत बसून त्यांना 40 मिनिटांचा ऑनलाइन कोर्स करण्यासाठी मार्गदर्शन करता येईल. या कोर्समध्ये आम्ही तुमच्या मुलांसोबत 3 सोपे नियम शेयर करणार असून, या नियमांचं पालन करून ते स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात.
कृपया याची नोंद घ्या की, या 5 मिनिटांच्या छोट्या कोर्समध्ये आणि त्यानंतरच्या 40 मिनिटांच्या मोठ्या कोर्समध्ये आम्ही मुलांना खाजगी अवयवांच्या संकल्पना शिकवणार आहोत. खाजगी अवयवांच्या संकल्पना शिकवताना, आम्ही त्यांचा उल्लेख ‘स्विमिंग सूट किंवा अंतर्वस्त्रांनी झाकले जाणारे अवयव’ असा करणार आहोत. या कोर्सेसमध्ये आम्ही त्यांना खाजगी अवयवांची नावं शिकवणार नाही.