Skip to main content

कोर्स अभ्यासक्रम

या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला रोहन व आयेशा ह्या दोन मुलांची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांना एकदा एका असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागला. ह्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला असुरक्षित परिस्थितींपासून कसे सुरक्षित ठेवू शकता, हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

ह्या संपूर्ण कोर्समध्ये, तुम्ही असुरक्षित परिस्थितींपासून कसे निघून जायचे आणि आपल्या आजूबाजूच्या प्रौढांकडून मदत कशी मागायची हे आम्ही तुम्हाला शिकविणार आहोत की.

तसेच तुम्ही इंटरनेटवर सुरक्षित राहावे ह्याची काही तंत्रे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आणि सर्वात शेवटी म्हणजे हा कोर्स संपताना, भविष्यात जर तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास तुम्ही आमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू शकता हेसुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.