कोर्स अभ्यासक्रम
आमच्या जनजागृती आणि प्रशिक्षण सत्रांदरम्यान, पालक, शिक्षक, व इतर संगोपकांकडून सातत्याने ज्या शंका व प्रश्न उपस्थित केले जातात त्यांना एकत्र करून त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ ह्या पुस्तिकेद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. . बाल लैंगिक शोषणाची समस्या समजून घेण्यासाठी संगोपकांना आवश्यक असलेली माहिती पुरवून त्यांचा शब्दसंग्रह वाढवण्याबरोबरच हे पुस्तक त्यांना कायदेशीर बाबी, प्रकटनांची हाताळणी, शोषणानंतर होणारे परिणाम व त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त अशा उपचारपद्धतींबाबत समग्र व मुद्देसूद मार्गदर्शन करेल असा विश्वास वाटतो.